- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
'चुका'-आपल्यातल्या दुसऱ्यातल्या
अवघड असतं स्वतःची चूक कबुल करणं ,
मात्रं खूप सोप्प असत दुसऱ्याला दोष देणं,
खरचं ? माणसाला असच वागायला आवडतं!
त्याला फक्त नाव ठेवायचं असत!
प्रत्येकाचं वागणच वेगळं असत ,ज्याच्यात्याच्या स्वभावानुसार,
तरीही आपण का करतो दुसऱ्याला गृहीत धरण्याचा विचार ?
हा वाईट तो चांगला, ती विचित्र,
अस वरवर निरीक्षण करून ,करायला आवडतो शेरा ,
आपण मात्र सगळ्यांपेक्षा चांगले असा असतो तोरा !
काहीही घडलं तरी ,आपल्यापेक्षा
दुसऱ्याच , आपल्या नाशीबाचं काय चुकलं ?
हाच विचार करतो आपण आधी ,
पण हयात आपण सुद्धा आहोत ना ,
हेच विसरतो आपण कधीकधी !
चुकण आहे महत्वाचं पण ,
चूक लक्षात घेऊन वेळीच सुधारणं हे आहे शहाणपण,
इथे मात्र का चुकल ,कोण चुकलं ह्यावरूनच होतं रामायण!
गरजेच आहे सुधारलेली चूक जगणं ,
आणि समंजस वागता येणं ,
पण इथे मात्र दुर्मिळच मोकळेपणानं बोलणं !
आपली चूक लपवून ,दुसऱ्याला दोष देण,
यापेक्षाही खूप चांगला आहे,
दुसऱ्याला दोष न देता स्वतःशी सुसंवाद साधणं!
आणि समंजस वागता येणं ,
पण इथे मात्र दुर्मिळच मोकळेपणानं बोलणं !
आपली चूक लपवून ,दुसऱ्याला दोष देण,
यापेक्षाही खूप चांगला आहे,
दुसऱ्याला दोष न देता स्वतःशी सुसंवाद साधणं!
नसत काही चूक किंवा बरोबर ,
कसं कळेल सांगा मग बघून वरवर ?
म्हणूनच तर आरशासमोर उभं राहून बघूया जरा ,
समजून घेऊया आपल्यातला प्रामाणिक /अप्रामाणिक चेहरा खरा !
कसं कळेल सांगा मग बघून वरवर ?
म्हणूनच तर आरशासमोर उभं राहून बघूया जरा ,
समजून घेऊया आपल्यातला प्रामाणिक /अप्रामाणिक चेहरा खरा !
टिप्पण्या
नमस्कार ,माझे विचार इथे व्यक्त करून खूप छान वाटतं ,माझे विचार तुम्हाला कसे वाटले मला नक्की पाहायला आवडेल 😊
उत्तर द्याहटवा