- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रणरणत्या उन्हात चौफेर नजर जावी,
आणि अचानक उंच आभाळात गेलेला,आपलं वेगळं अस्तित्व जगत असलेला भाबडा गुलमोहर दिसावा!
फांदी फांदीला बहरलेली पानं,आणि त्याच्या देखण्या फुलांकडेे आकर्षित झालेलं मन😊
किती वेड वाटतं ना,नेहमीसारखं. .......
अशातच अचानक यावा हळुवार वारा ,
दाटून यावा मनाचा आठवणींचा कोपरा..
अन् पाहतच रहावं त्या प्रसन्न गुलमोहराकडे निवांत. ..........
क्षणभर त्याची लक्ष वेधणारी आकर्षक फुलं आपल्यालाच पाहतायत असं वाटावं ,
आपणही पाहावं त्यांना आनंदाने न ओरबाडता..... न खुडता....
पाहावा तो रंग,त्यांच असणं मनात साठवून घ्यावं. ....मोठ्ठं घबाड मिळाल्यासारखं. .....कायमचं. .
खाली विखुरलेल्या पाकळ्या फुलांच्या,
हातात घ्याव्या भाग्यवान असल्यासारख्या. ...
आणि मग पुन्हा उधळून द्याव्या सहज ..सुख बरसल्यासारख्या😊
डोळे दिपून जावे त्या गुलमोहराचं अनमोल सौंदर्य बघता बघता...
पूर्ण वातावरणात त्याचं असणंच शोभून दिसावं,...नव्याने ....
आणि ते बघून आपल्यातला अहंकारही कुठल्याकुठे गळून पडावा. .पिकल्या पानासारखा...
मग वाटतं,
आपल्याही विचारांनी त्याच्या फांद्यांसारखं स्वप्नांच्या वारयासोबत बेहिशोब झुलावं..
सकारात्मकतेच्या फुलांनी बहरावं बिनधास्त आपली वेगळी ओळख घेऊन. .
तरीही शेवटी एका जागी ठाम ,स्पष्ट ,आपल्यातला वेगवेगळेपणा जपत....
आणि जमिनीवरे आपले भक्कम पाय रोवून आनंदानं ऊभं रहावं...
त्या गुलमोहरासारखं...............😊
-कुणाल विजय ठाकरे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या

खुपचं छान
उत्तर द्याहटवाThanks ❤
हटवा