- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मी ....अनोखा. ....रंग .....मी......
मी "मी " नाही "मी" आहे दुसराच कुणीतरी. ..
मी आहे सुर्यासारखा प्रकाश पसरवणारा......
मी आहे बेभान वाहणारा वारा.....
मी आहे पाऊस. ..मेघराज. ..मल्हार. ...
मी आहे सरींसारखा थंडगार. .......
मी आहे धून कोकिळेची....
मी आहे सूर निसर्गाचा. ....
मी कोवळ्या पालवीसारखा...
मी आहे फुललेल्या फुलबागेतला रूबाबदार गुलाब
. .
मी आहे उत्तुंग आभाळातला भाबडा पक्षी....
मी आहे गगनभरारी उमेदीची.....
मी आहे मृदगंधासारखा...सहज सुंदर. ...
मी आहे...हिरव्यागार गवताची पात....
मी आहे...निखळ चिवचिवाट. ....
मी आहे....आशावादी पहाट....
मी आहे अल्लड बागडणारं फुलपाखरू. .......
मी आहे...मनमोहक सतरंगी इंद्रधनू. ...
मी आहे बासरीची धून. ..
मी आहे..कोवळं ऊन. .....
मी आहे...पारिजातकाच्या सड्यासारखा.....
मी आहे उत्साही पतंगासारखा......
मी आहे...पुरणपोळीतला गोडवा....
मी आहे...साधाभोळ्या रानमेव्यासारखा.......
मी आहे जाई-जुईच्या सुवासात...
मी आहे....मोकळी. ...नागमोडी. ..पायवाट......
मी आहे.....बहरलेल्या गुलमोहरात......
मी आहे...मखमली ....शेवंती.....
मी आहे....रातराणी फुललेली. ....
मी आहे त्या डोलत्या पीकात...
मी आहे....अंकुर फुटलेल्या. ...जीवात....
मी आहे....अखंड. ....अनंत....न मोजतायेण्यासारखा. .....
मी आहे तुलनेपलीकडे.....
मी आहे...मित्र शब्दांचा. ....
मी आहे.....विचारी मनात...
मी आहे....स्वतःच्याच प्रेमात....
तरीही मी ......रमलोय निसर्गात....
मी आहे...मोठा समुद्र. .....
मी आहे ...बेचैन लाट.....
मी आहे..मोकळा..बेधुंद. ....ऊनाड....
त्या तबल्याच्या थापेसारखा.....
कधी मी कष्टाच्या भाकरीसारखा.....
कधी मी महागडया वस्तूसारखा....
मी आहे न उलगडलेल्या ...गूढ. ..पुस्तकासारखा...
मी आहे...पानोपानी. ..हरवलेला..
मी आहे ... मधाळ...मधमाशीसारखा....
मी आहे वाहतं निर्मळ पाणी.....
मी आहे...पावलं अनवाणी......
मी आहे....चमकणारी चांदणी. ...
मी आहे....काजवा अनोखा अंधारातला......
मी आहे....अवखळ हसू ओठांवरच.....
मी आहे...प्रेरणा..नजरेतली..
मी जाणिवांचा ओलावा....
मी नव्याची आसही...
मी आहे सालस मोगरा फुललेला. .......
मी आहे चैतन्याची ओढही......
मी बंध जीवाचे मनातले....
मी आहे गीत स्फुरलेले मनातले.....
मी अबोल .....तरीही बोलघेवडा. .....
मी गोंधळातली...शांतता. ...
मी आहे स्वप्न बेभान. ...
मी आहे....आनंद .. मनातला...
मी आहे. ...वाहत्या पाण्यासारखा...
मी आहे झरा सकारात्मकतेचा......
मी आहे इर्षेपलीकडे....
मी आहे समाधानाच्या अलीकडे....
मी राहतो बाजूला...नम्रतेच्या....
मी ...आहे ...पारदर्शक आरशासारखा...
मी आहे मनमोकळा ....मी आहे..फुललेल्या सदाफुलीसारखा.....
मी ...सापडतो मलाच रोज नव्याने. ..इतरांत....
मी सतत शोधतो मला.....माझ्याच ..जगण्यात...
मी ..भटकंती करणारा..करू पाहणारा...एक वेडा..मुसाफिर. ...
मी फितूर आहे...माझाच....
मी आहे "मी"पणाच्या पलीकडे....आणि जगण्याच्या अलीकडे....
खूप काही मी ...माझ्याच नजरेत.. .आहे....
मी एक वेगळेपण जपणारा फिनिक्स पक्षी आहे...
मी आहे नवखा...मी आहे ...जगण्याला अर्थ देउ पाहणारा...सकारात्मकतेचा फिकुटलेला चेहरा..
हो मी "मी" नाही ....मी आत्ता आम्ही ..आपण
होऊ पाहतोय..आपले ध्येयवेडे पंख पसरून. ...
-@कुणाल विजय ठाकरे .
.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा