- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जगणे.....जगणे...... 😍😍
ना मोह हा कशाचा.....
तरीही जीव का भुलावा....
स्वप्नातला चेहरा मनाचा दिसावा.....
अन् आपले सूर सापडावे पुन्हा. ....
जगणे ...जगणे...जगूया रे पुन्हा. ...
मन व्हावे फुलपाखरासारखे ....
प्रेम फुलावे मनातले बेधुंद. ...
जगणे पुन्हा वाटावे. .बेभान निसर्गासारखे....
सूर आपलेच जाणवावे कणाकणाने पुन्हा. ...
जगणे ...जगणे...जगूया रे पुन्हा. .
स्वच्छंदी पावले..तरीही उत्साही वाटावी...
जग दिसावे निराळे क्षणाक्षणाला. ......
शहाणे व्हावे वेडे मन..पाहून. ..जगण्याला...
जगणे ...जगणे...जगूया रे पुन्हा. .
तरीही पांघरावेसे वाटावे ...वेड पक्ष्यांपरी...
घ्यावी ध्येयवेडी भरारी ......आकाशी.....
मनमोकळे असावेसे वाटावे ...पुन्हा. .पुन्हा. .
जगणे ...जगणे...जगूया रे पुन्हा. .
सतत नव्याने नवलाईने ....फुलूया..हसूया...जगूया. .
मनमुराद.......
जगणे ...जगणे...जगूया रे पुन्हा. .
-@कुणाल विजय ठाकरे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा