- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वास्तव...
सत्तेच्या संघर्षात भरडून निघाली जनता..
अत्याचाराच्या वणव्यात केव्हाच जळाली हो समानता....
बरं आत्ता कशाला उगाचच चांगुलपणाचा आटापिटा करताय..?
का वरून न ताज्या जखमांवर मीठही चोळताय...?
दोषारोपांची चिखलफेक तर नित्यच सुरू आहे...
ओल्या सोबत सुक्कंही जळतंच आहे...!
बुद्धीबळाच्या पटावर जनता चिरडत आहे...!
भ्रष्टाचारी बसले बघत त्रासलेल्यांची मज्जा...
त्यांना कुठे फरक पडतो ...
बघून व्यवस्थेचा उडालेला फज्जा...!
जो तो आपली पोळी भाजुन घ्यायच्या मागे...
इथे चोराचेच आहेत पोलिसांशी धागे...!
भेद माणसांचे ..किती तरी प्रकारचे वाढतच चालले..
मिळालेल्या स्वातंत्र्याचे महत्त्व फक्त त्या सैनिकांनाच
समजले.....
विकासाच्या नावाची फक्त करतात ते चर्चा. ....
नजरेत फक्त असतात वेगवेगळ्या खुर्च्या. ..!
वचनांचा पाऊस दरवर्षीो धो पडतो ....
कष्टकरी जीव तडफडत मरतो...!
कोणाची झोळी कायमच भरलेली,गरज नसताना...
कोणाचा मात्र जीव जातोय पोटापुरता कमावताना...
देखावे प्रगतीचे किती सहज जमतात इकडे...
प्रत्यक्षात जगण्याचे काढलेत वाभाडे...!
कोणाचं भलं होऊच नये ...असच वाटत असेल..
तर काहीच सुधारणार नाही...
तरीही काहीजण मात्र ह्या ही अवस्थेत पुरून उरलेत. .
कारण ,आपल्या माणसांचे हाल त्यांनी पाहिलेत....
बोगसपणाला उत्तर तेही देतातच ....कारण इथे ..
स्वच्छ खरेपणा नाही तर ...रंगवलेल्या खोटेपणाला
जास्त भाव आहे.....
तरीही सगळं सुंदरच आहे म्हणा ....
कारण हा वास्तवातला खेळ जुनाच ....
नव्याने सुरू आहे...
स्वनिर्मित संकटांना मात्र संकटांनीच सोडवणं सुरू आहे....
सत्तेच्या खोल डोहात माणसांची ....अगणित निष्पाप
मनांची घालमेल..तगमग...जगण्याची धडपड निवांत सुरू आहे.....!
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
English translation. ..
Reality...
People are full of power struggle ..
Equality has always burned in the forest of atrocities ....
Well, why are you trying to be good now ..?
Why even rub salt on fresh wounds from above ...?
The mudslinging of accusations is still going on ...
It is burning dry with wet ...!
People are crushing on the chess board ...!
Seeing the corrupt sitting, the fun of the troubled ...
Where does it matter to them ...
Seeing the fuss of the system ...!
Joe is behind roasting his chicken ...
Here are the threads of the thief with the police ...!
The differences between the people are increasing.
The importance of the freedom gained only to those soldiers
Got it .....
They only talk in the name of development. ....
There are only different chairs in sight. ..!
The rain of promises falls every year ....
Hard working creatures die in agony ...!
Someone's bag is always full, when there is no need ...
Whose life is lost while earning a living ...
How easily the scenes of progress are gathered here ...
Actually rented out to live ...!
No one should get better ... it must feel like that ..
So nothing will improve ...
However, some remained in this state. .
Because, they saw the condition of their men ....
They also give answers to bogusness .... because here ..
Not pure truth but ... painted falsehood
The price is too high .....
Still, everything is beautiful ....
Because this game is really old ....
Newly started ...
Self-created crises, however, are being solved by crises ....
In the deep pool of power, people ... countless innocents
The struggle for survival is in full swing .....!
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
@creative kunal

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा